नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये घोटी सिन्नर हायवे वरती सह्याद्रीच्या कुशीत व कळूसुबाई शिखराच्या पायथ्याजवळ दारणा नदीच्या खोऱ्यात घोटी पासून ५ कि.मी अंतरावर उभाडे हे गाव वसलेले आहे.याच गावाची एक छोटीशी ठाकर समाजाची वाडी अस्तित्वात आहे याच वाडीला उभाडे या आडनावावरून उभाडेवाडी असे नाव पडले.जेमतेम ७०-८० कुटुंब असलेली हि एक छोटीशी वाडी आहे.याच वाडीत मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने जि . प . प्राथमिक शाळा उभाडेवाडी हे
विद्यामंदिर इ . स. १९९२ पासून अस्तित्वात आले . निसर्गरम्य ,आल्हाददायक
वातावरणात या वस्तीत मुले इ . १ ली पासून ४ थी पर्यंत शिक्षण घेत आहेत. व
आपल्या भविष्याचा पाऊलखुणा शोधण्याचा एक उत्तम प्रवास करत आहे.
सर.खुप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवा